पेट्रोल – डिझेलचे दर वाढले; जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली – देशातील इंधनाच्या दराबाबत दोन महिने थांबल्यानंतर आता तेल कंपन्यांना पुन्हा त्यांच्या भावाच्या स्थितीसंबंधात निर्णय घेण्यास केंद्र सरकारने अनुमती दिली आहे. त्यानुसार आता पुन्हा इंधन दरवाढीचा सिलसिला सुरू झाला आहे.

आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे 17 पैशांनी तर डिझेलच्या दरात 22 पैशांची वाढ करण्यात आली आहे. बिहार निवडणुकीच्या काळात तेल कंपन्यांना इंधन दरवाढ करण्यास मनाई करण्यात आली होती.

आजच्या नवीन दरांनुसार दिल्लीत पेट्रोलचा दर आता 81 रूपये 23 पैसे इतका झाला आहे तर डिझेलचा दर 70 रूपये 68 पैसे इतका झाला आहे. 22 सप्टेंबर नंतर प्रथमच आज इंधन दरांमध्ये हे फेरबदल झाले.

पेट्रोलच्या दरात गेल्या 58 दिवसांत कोणतेही फेरबदल करण्यात आले नव्हते तर डिझेलच्या दरात गेल्या 48 दिवसांत कोणतेही बदल झाले नव्हते. मुंबईत पेट्रोलचा दर 87 रूपये 92 पैसे इतका झाला आहे तर डिझेलचा दर 77 रूपये 11 पैसे इतका झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.