‘त्या’ बडतर्फ पोलिसाचा जामीन फेटाळला

पुणे – चाकुने वार करून आणि डोक्‍यात दगड मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत गोल्डमॅनचे 2 लाख 48 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याप्रकरणात बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयंत राजे यांनी फेटाळला. तो गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. त्याने कट रचला आहे. त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल आहे.

गुन्हा घडल्यापासून सुमारे 11 महिने तो फरार होता. पुराव्यात ढवळाढवळ करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याचा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील ऍड. राजेश कावेडीया यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने याबाबत आदेश दिला.

पोपट मुरलीधर गायकवाड (वय 33, रा. दौंड) असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात अन्य तिघांवर गुन्हा दाखल आहे. त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, एकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सुरज राजाराम बांदल (वय 24, रा. करंडे, ता. शिरूर) याने याबाबत शिरूर पोलिसात फिर्याद दिली असून, अंकुश सुदाम बांदल असे घटनेत जखमी झालेल्याचे नाव आहे. अंकुश जास्त सोने परिधान करत असल्याने त्याला गोल्डमॅन म्हणत असत.

ही घटना 1 सप्टेंबर 2019 रोजी शिरूर तालुक्‍यातील करंडे गावच्या हद्दीत घडली. अंकुश बांदल याला लुटण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार अंकुश याला मारहाणद्वारे जखमी करून जबरदस्तीने सोन्याचे दागिने नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गायकवाड यानेच हा कट केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात गायकवाड याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. यास सरकारी पक्षातर्फे राजेश कावेडीया यांनी विरोध केला

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.