प्रत्येक दिवसाला 40 किलोमीटर महामार्गाची उभारणी होणार – नितीन गडकरी

नवी दिल्ली – सध्या देशात महामार्ग उभारण्याचे काम अतिशय वेगात चालू आहे. या वर्षात आतापर्यंत 11,035 किलोमीटर महामार्गाची उभारणी झाली आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाला 33 किलोमीटर महामार्ग उभारले जातात.

आगामी काळात या कामाचा वेग आणखी वाढणार असून 31 मार्च पर्यंत प्रत्येक दिवसाला 40 किलोमीटर एवढ्या महामार्गाची उभारणी होणार असल्याचे महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले. या आर्थिक वर्षामध्ये बराच काळ लॉकडाउन असूनही महामार्ग निर्मितीच्या कामावर मात्र कसलाही परिणाम झाला नसल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले.

जेव्हा आपण महामार्ग मंत्री म्हणून काम सुरू केले होते त्यावेळी दिवसाला फक्त दोन किलोमीटर महामार्ग उभारले जात होते. 406 प्रकल्प रखडले होत. त्यामध्ये 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अडकली होती. मात्र आपण अतिशय कार्यक्षमरित्या कामाची सुरुवात केली. त्यामुळे बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता 3 लाख कोटी रुपयांनी कमी झाली असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.