न्हावी सांडसच्या सरपंचपदी नामदेव शितोळे ; उपसरपंचपदी मोहन खाडे यांची निवड

वाघोली – हवेली तालुक्‍यातील राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्हावी सांडस (ता. हवेली) येथील सरपंचपदी नामदेव किसनराव शितोळे तर उपसरपंचपदी मोहन भिकाजी खाडे यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुका युवक अध्यक्ष तसेच माजी सरपंच योगेश बाळासाहेब शितोळे यांच्या श्रीनाथसाहेब यांचे ग्रामविकास पॅनलचे सलग तीन पंचवार्षिक वर्चस्व कायम राहिले आहे. ग्रामविकास अधिकारी आनंद कांबळे, निवडणूक अधिकारी अमित रणवरे, लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश भोसले, बीट अंमलदार सचिन गिलबिले यांच्या उपस्थितीत निवडणूक शांततेत पार पडली. निवडणुकीचा पूर्ण अहवाल माजी ग्रामपंचायत रणजीत दिलीपराव पन्हाळे यांनी दिला.

यावेळी माजी सरपंच प्रदीप कांबळे हरिभाऊ शितोळे, रामकृष्ण शितोळे, संतोष शितोळे, सुभाष शितोळे, पांडुरंग शितोळे, निवृत्ती शितोळे, तुकाराम शितोळे, किसन शितोळे आदी मान्यवर उपस्थित होते.

येत्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने गावातील विविध विकास कामांवर लक्ष केंद्रित करून ऍड. आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून गावासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच नामदेव शितोळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.