प्रभात ऑनलाइन – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आगामी नवीन वाहन भंगार धोरणाविषयी (वेहिकल स्क्रॅपेज पॉलिसी) अधिक माहिती दिली आहे. हे धोरण लागू झाल्यानंतर रस्त्यावर प्रदूषण करणारी जुनी वाहने हटविली जातील.
गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रस्तावित केलेले धोरण कार उत्पादकांची दीर्घकाळची मागणी आहे. नवीन वाहन स्क्रॅपेज पॉलिसीमुळे नवीन वाहन विक्रीस चालना मिळू शकेल. या धोरणाचे सर्व तपशील अद्याप सार्वजनिक केले गेले नाहीत. त्याआधी वाहन मालकांसाठी आवश्यक असणाऱ्या पाच गोष्टींबद्दल आणि हे धोरण आपल्यावर कसा परिणाम करू शकते याबद्दल जाणून घेऊया.
1. पाच टक्क्यांची सवलत मिळणार :
नवीन वाहन स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत आपली जुनी वाहने देण्याचा पर्याय निवडणाऱ्या वाहन मालकांना नवीन स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत नवीन वाहन खरेदी करताना लाभ मिळणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या म्हणण्यानुसार जे वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीअंतर्गत नवीन वाहन खरेदी करतील त्यांना वाहन कंपन्यांकडून सुमारे 5 टक्के सूट मिळेल.
2. सवलत कशी मिळणार ?
गडकरी यांनी जुन्या वाहनांवर 5 टक्के सूट जाहीर केली असली, तरी जुन्या वाहनांसाठी हे सवलतीचे दर कोणते घटक ठरवतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे मानले जाते की सवलत दर निश्चित करण्यासाठी विकल्या जाणाऱ्या जुन्या वाहनांचे वय आणि स्थिती महत्त्वपूर्ण असू शकते. तथापि, सरकार वाहनांच्या विशिष्ट वयानंतर रस्त्यावर वाहने चालवू देणार नाही. ज्यानंतर त्यांना तपासासाठी फिटनेस सेंटरमध्ये जावे लागेल. या धोरणाची वैशिष्ट्ये येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
3. वाहन स्क्रॅपेज पॉलिसी
वाहन स्क्रॅपेज पॉलिसीनुसार 20 वर्षापेक्षा जुन्या प्रवासी कारच्या मालकांना त्यांच्या कारची अनिवार्य योग्यता चाचणी घ्यावी लागेल. पीपीपी तत्त्वावर तयार केली जाणारी ही चाचणी सुविधा स्वयंचलित चाचण्या घेईल आणि रस्त्यावर वाहन चालविण्यासाठी फिट आहे की नाही हे प्रमाणित करेल. 15 वर्षांपेक्षा जुन्या व्यावसायिक वाहनांसाठी अशाच तंदुरुस्ती चाचण्या केल्या जातील.
4. दंड भरावा लागेल :
एखादे वाहन ही स्वयंचलित चाचणी उत्तीर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास ते रस्त्यांवरून काढून घ्यावे लागेल किंवा भरपाई दंड भरावा लागेल. म्हणूनच, जर आपले वाहन नवीन पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वयापेक्षा जास्त झाले असेल आणि स्वयंचलित चाचणीत देखील अयशस्वी झाले असेल, तर अशी वाहने रस्त्यावर दिसल्यास ते पकडले जाण्याची शक्यता आहे. रस्त्यावर अशी गाडी चालवताना किती दंड आकारला जाऊ शकतो याची अद्याप अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.
5. ग्रीन टॅक्स भरावा लागेल :
जर आपले वैयक्तिक वाहन 8 वर्षांपेक्षा जास्त जुने असेल परंतु स्वयंचलित चाचणी उत्तीर्ण झाली असेल तर हे धोरण अंमलात आल्यानंतर त्याला ग्रीन टॅक्स देखील भरावा लागेल. हा ग्रीन टॅक्स रस्ता कराच्या रकमेच्या 10 ते 25 टक्के असणे अपेक्षित आहे. जेव्हा आपण वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी जाता तेव्हा कर व्यतिरिक्त हे शुल्क आकारले जाईल.