व्याज अनुदान योजनेचा होत आहे दुरुपयोग

संबंधित योजनांना कर्ज न देण्याच्या एनएचबीच्या सूचना

मुंबई – विकसकांना आता ग्राहकांच्या घराचा प्री-ईएमआय भरता येणार नाही. नॅशनल हाऊसिंग बॅंकेने (एनएचबी) यासंदर्भात गृहकर्जे देणाऱ्या कंपन्यांना अशा प्रकारच्या कर्ज योजना न देण्याचे निर्देश दिले आहेत. विकसकाकडून ग्राहकांना प्री-ईएमआय भरण्याचे आमिष दाखवून नंतर अधिक पैसे वसूल करीत फसवणूक होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एनएचबीने हा निर्णय घेतला आहे.

अशा प्रकारच्या गृहकर्जासंबंधीच्या व्याज अनुदान योजनेद्वारे (सबव्हेन्शन स्कीम) फसवणूक होत असल्याच्या तक्रारी एनएचबीकडे आल्या आहेत. या तक्रारींचा विचार करता एनएचबीने परिपत्रक काढून अशा कर्ज योजना न देण्याचे निर्देश दिले आहेत.

अशा प्रकारच्या सबव्हेन्शन योजनेंतर्गत ज्या कंपन्यांनी गृहकर्जे मंजूर केली आहेत. मात्र, त्यांचे अद्याप वितरण झालेले नाही, अशा प्रकरणांमध्येही एनएचबीचा आदेश लागू होणार आहे. यापूर्वीही 2016 मध्ये एनएचबीने दिलेल्या आदेशात म्हटले होते की, गृहकर्जाची रक्कम ही केवळ बांधकामाच्या टप्प्याप्रमाणेच देण्यात येणे बंधनकारक आहे.

एनएचबीच्या या आदेशावर अनेक बिल्डर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे बिल्डर्सच्या भांडवल सुलभतेवर परिणाम होईल, तसेच या योजनेमुळे घर खरेदीसाठी आकर्षित होणाऱ्या ग्राहकांना प्रोत्साहन मिळणार नाही, असे विकसकांच्या संघटनांचे आणि सल्लागारांचे मत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)