मुंबईत पुढील पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा

मुंबई- मुंबईत तत्काळ रक्ताची गरज भासली तर ते मिळेलच याची आता शक्‍यता कमी आहे. कारण सध्याच्या घडीला मुंबईत पुढील 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. करोनामुळे गेल्या 5 महिन्यांपासून रक्तदान शिबिरात कमालीची घट झाल्याने मुंबईत रक्तसाठा कमी झालेला आहे.

“रक्तदान श्रेष्ठ दान’ असे आपण म्हणत असतो. या वाक्‍याला प्रेरीत होऊन आपण रक्तदानही करत असतो. मात्र गेल्या 5 महिन्यापासून मुंबईत रक्तदान शिबिरांमध्ये कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम आता मुंबईकरांवर होत आहे.

मुंबईत करोनाचे संक्रमण होण्यापूर्वी दोन ते अडीच हजार रक्तदान शिबीर दर महिन्याला आयोजित होत होती. मात्र करोनामध्ये हजार ते बाराशे शिबीर झाली आहेत. या कालावधीत 50 टक्के रक्तदानात घट झालेली आहे. पूर्वी 50 टक्के सामान्य नागरिक रक्तदान करायचे तर 15 टक्के कॉलेज व 35 टक्के कॉर्पोरेट मधून रक्तदान शिबीरातून रक्त उपल्बध व्हायचे. मात्र करोनामुळे 5 महिन्यात ते मिळाले नाही.

2020 मधील रक्तसाठा
महिना – युनिट
जानेवारी – 168144
फेब्रुवारी – 145289
मार्च – 110437
एप्रिल – 53630
मे – 91137
जून – 99658
जुलै – 60750
ऑगस्ट – 62001
सप्टेंबर – 63888

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.