धोनी भारतासाठी सर्वात उपयुक्त ठरेल – अब्बास

नवी दिल्ली – त्याच्या कडे असलेली क्रिकेटची जाण आणि सामन्यातील परिस्थीती ओळखण्याची क्षमता या दोन्ही गोष्टीमुळे धोनी भारतीय संघासाठी महत्वाचा खेळाडू असुन विश्‍वचषक स्पर्धेत तोच भारतीय संघासाठी सर्वात उपयुक्त खेळाडू ठरेल असे विधान पाकिस्तानचा माजी कर्णधार जहिर अब्बास यांनी केले आहे.

याविषयीपुढे बोलताना अब्बास म्हणाले की, भारतीय संघाने धोनीच्या उपस्थितीत अनेक स्पर्ध जिंकल्या आहेत. ज्यात तो कर्णधार असताना 2007 सालची टी-20 विश्‍वचषक स्पर्धा असेल किंवा 2011 सालची एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धा असेल. या दोन्ही स्पर्धांमध्ये धोनीने आपल्या चाणाक्ष बुद्धीचा वापर करत भारतीय संघाला विजेतेपद मिळवून दिले होते. तशाच प्रकारची कामगिरी धोनी आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली विश्‍वचषक स्पर्धेत करेल यात शंका नाही.

तसेच पुढे बोलताना अब्बास म्हणाले की, तो केवळ आपल्या बुद्धिनेच नव्हे तर यष्टींमागे असलेल्या त्याच्या वेगवान हालचालींनी कोणत्याही फलंदाजांना धडकी बह्रवतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो सध्या जगातील सर्वात आक्रमक आणि सर्वोत्तम फिनिशर आहे, ज्यामुळे तो संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत असतो. हे त्याने गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये दाखवुन दिले आहे.

तसेच पुढे बोलताना अब्बास म्हणाले की, विराट कोहली देखील यावेळी आपण कर्णधारपदी उपयुक्त खेळाडू असल्याचे दाखवुन देण्यासाठी उत्सुक असल्याने तो भारतीय संघाच्या विजयासाठी अखेरपर्यंत झुंज देइल हे विसरायला नको. त्याच बरोबर सध्याची भारतीय संघाची फलंदाजांची फळी बघता भारतीय संघ इंग्लंद मधील मैदानांवर 400 ते 450 धावांची मजल सहज मारु शकेल आणि त्यांचे गोलंदाज अशा खेळपट्‌टयांवरही संघासाठी धावा वाचवण्याची शक्ती ठेवतात, त्यामुळे भारतीय संघाला पराभुत करणे हे या विश्‍वचषकातील सर्वात कठिण आव्हान असणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद करताना ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड आणि न्युझीलंड हे संघ उपान्त्य फेरीत पोहोचतील असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.