आळंदी – सातारा लोकसभा संघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या मामी श्रीमती सुशिला भार्गवराव पवार (वय 95) यांच्या निधनानंतर त्यांचे अस्थिविसर्जन आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीमध्ये सर्व धार्मिक विधी करून करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, बबनराव कुऱ्हाडे पाटील, माजी नगराध्यक्ष विलासभाऊ घुंडरे पाटील, राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी नगरसेवक डि.डि. भोसले पाटील, नगरसेवक प्रकाशराव कुऱ्हाडे पाटील, नंदकुमार वडगावकर, बाबुलाल घुंडरे, मनोज कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे, माजी नगरसेवक संतोषजी चोरडिया, संजय वडगांवकर, माऊली शिंदे, सुल्तान शेख उपस्थित होते.