कॉंग्रेसची मध्य प्रदेशात पोस्टरबाजी

भोपाळ -कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वारंवार राफेल विमान खरेदी प्रकरणावरुन निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात कॉंग्रेसने लावलेल्या पोस्टरने खळबळ माजली आहे. या पोस्टरवर नरेंद्र मोदींना रावणाच्या रूपात दाखवण्यात आले आहे. तर राहुल गांधींना रामाच्या रूपात दाखवण्यात आले.

राहुल गांधी मोदींच्या दिशेने बाण मारण्यास सज्ज झाल्याचे पोस्टरवर दिसत आहे. परवा राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले. यानंतर मध्य प्रदेशात कॉंग्रेसने पोस्टर लावून मोदी आणि भाजपावर निशाणा साधला. राफेल डीलवरुन राहुल गांधी पंतप्रधानांवर सतत टीकास्त्र सोडत असताना आता मध्य प्रदेश कॉंग्रेसने याचवरून पोस्टरवॉर सुरू केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेसच्या पोस्टरमध्ये मोदींना रावणाच्या रुपात दाखवण्यात आले आहे. पोस्टरवर मोदींची दहा तोंडे दिसत आहेत. यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली, गृहमंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री पियूष गोयल, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे चेहरे पोस्टरवर दिसत आहेत.

याशिवाय एका राफेल विमानासह चौकीदार ही चोर है ही राहुल गांधींनी दिलेली घोषणादेखील पोस्टरवर आहे. याआधीही अनेकदा राहुल यांना कॉंग्रेसने पोस्टरवर राम भक्ताच्या रुपात दाखवले आहे. मात्र या पोस्टरमधून राम मंदिराच्या मुद्द्याला स्पर्श करत कॉंग्रेसने राफेल डीलवरूनही भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. गेल्या काही दिवसापासून उत्तर भारतातील अनेक राज्यांत पास्टर वॉर सुरू आहे. कार्यकर्ते विरोधी पक्षाच्या नेत्यावर पोस्टरच्या माध्यमातून टीका करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)