नवी दिल्ली – देशात लॉकडाऊन असल्यामुळे नागरिकांसह सेलिब्रिटी आणि क्रीडापटू देखील घरातच आपल्या आवडी निवडीच्या गोष्टीत मन रमवत आहेत. भारतीय संघाचा अव्वल वेगवान गोलंदाज महंमद शमी देखील आपल्या आवडीच्या चित्रकारितेत रमण्याचा आनंद लुटत आहे.
खुद्द शमीनेच काढलेल्या चित्रांची पोस्ट सोशल मीडियावर केली आणि नेटकरी मंडळींनी त्याच्या कलेचे मनापासून कौतुक केले.
Trying out some sketches after years…how do you think about the “The Artist Md Shami”? 😅#TeamIndia pic.twitter.com/lxzifPNZeP
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) April 9, 2020
लहानपणापासून आपल्याला हा छंद आहे. मात्र, जेव्हापासून क्रिकेट धडे गिरवायला सुरुवात केली तेव्हापासून हा छंद जोपासण्यासाठी कधी निवांत वेळच मिळाला नव्हता. आता करोनाच्या धोक्यामुळे घरातून बाहेर पडता येणे शक्य नाही मग वेळ कसा सार्थकी लावायचा हा विचार केला आणि पुन्हा एकदा कॅनव्हासवर चित्र काढण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा नवशिका असल्याप्रमाणे वाटले. मात्र, जसे लहानपणी सायकल चालवायला शिकल्यानंतर कितीही वर्षे खंड पडला तरी आपण पुन्हा सायकल चालवु शकतो त्याप्रमाणे माझी चित्रेही व्यवस्थित काढली जात आहेत, अशा शब्दात शमीने आपल्या भावना व्यक्त केल्या.