“केंद्राचं नवं शैक्षणिक धोरण राज्याला ‘मारक’; 1 लाख शाळा, 35 हजार काॅलेज बंद होण्याची भिती”

कोल्हापूर-  केंद्र सरकारचं नवं शैक्षणिक धोरण राज्य सरकारने फेटाळून लावलेलं नाही. उलट कमी पटाच्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलीय, असे सांगत केंद्र सरकारचं नवं शैक्षणिक धोरण जर अमलात आलं तर देशातील एक लाख शाळा आणि 35 हजार कॉलेजही बंद होतील याची भीती आहे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केलीय. ते कोल्हापूरात पत्रकार पतिषदेत बोलत होते.

दरम्यान, प्राचीन आणि सनातनी मूल्यांचा नवं शैक्षणिक धोरण हे गौरव करत आहे. संविधानिक मूल्यांचा नाही, असं सांगत राज्यातील आघाडी सरकारला हे मान्य आहे का ? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केलाय. त्यामुळेच आघाडी सरकारला धक्का देण्याच्या तयारीत आम्ही आहोत असं शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी म्हटलंय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.