विखे पाटलांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण, म्हणाले….

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीआधी अनेक जण भाजप पक्षात येण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज असल्यानं अनेक जण संपर्कात आहेत. मात्र याबाबत अंतिम निर्णय हा भाजप पक्षश्रेष्ठींचा असेल. असा गौप्यस्फोट गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त विखे पाटील हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत, यावेळी सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात आले असता माध्यमांशी ते बोलत होते. याआधी त्यांनी आजसकाळी पंढरपूर येथे श्री. विठ्ठल रुक्मिणीचे सपत्नीक दर्शन घेतले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर अनेक जण नाराज आहेत. त्यामुळे मी स्वत:सुध्दा भाजप पक्षात आलो. येत्या काही दिवसात आणखी जर कोणी युतीत प्रवेश केला तर त्यात आश्चर्य नाही.’,

Leave A Reply

Your email address will not be published.