“मंत्री असणारा माणूस किती निर्बुद्ध आहे याचं उत्तम उदाहरण जित्तुद्दिन उर्फ जितेंद्र आव्हाड”

मुंबई | कुंभमेळा आयोजन करण्याबाबत मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नाला ” कुंभाचा निर्णय तुमच्या डोक्याने नाही तर ग्रहस्थिती नुसार होतो” असं उत्तर आचार्य तुषार भोसले यांनी दिले आहे.

“मियाँ जित्तुदीन, जे कळतं तेच बोला, मंत्री असणारा माणूस किती निर्बुद्ध आहे याचं उत्तम उदाहरण जित्तुद्दिन उर्फ जितेंद्र आव्हाङ आहेत. कुंभाचा निर्णय तुमच्या डोक्याने नाही तर ग्रहस्थिती नुसार होतो. गुरु कुंभ राशीत आणि सूर्य मेष राशीत असा आवश्यक ‘अमृत योग’ 2022 मधे नव्हता. हा निर्णय वेदशास्त्र तथा ज्योतिषशास्त्रात पारंगत असलेल्या ‘विद्वत परिषद’ तसेच शंकराचार्य, आचार्य आणि आखाडा परिषद यांच्या मान्यतेने झाला. यापूर्वी अशीच घटना सन 1760,1885 आणि 1938 मधे झाली आहे. केंद्र सरकार आणि उत्तराखंड सरकारने या धर्मादेशाचे पालन केले.

महाराष्ट्रात वारी, देवस्थाने बंद ठेऊनही जगात कोरोनाचा सर्वाधिक प्रसार आणि त्या उद्रेकाने मृत्यु महाराष्ट्रातच झालेत, होत आहेत. या महापापाला तुमचं सरकार जबाबदार आहे, तेव्हा आधी स्वत:च्या अपयशावर बोला ! एक मुंब्र्याचा मोहल्ला राखण्याच्या नादात आम्हाला धर्मशास्त्र शिकवू नका “!!. अस उत्तर आचार्य भोसले यांनी ट्विट करत दिलं आहे.

दरम्यान, उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुंभमेळा सुरू होण्याच्या तोंडावरच देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाला. त्यामुळे कुंभमेळा रद्द करण्याचीही मागणीही झाली. मात्र, त्याला कारणं देत नकार देण्यात आला. अखेर कुंभमेळ्यात करोनाचा शिरकाव झाल्यानंतर अनेक आखाड्यांनी समाप्त झाल्याची घोषणा केली. तर पंतप्रधानांच्या आवाहनानंतर प्रातिनिधिक स्वरूपात कुंभमेळा पार पडला.पण त्यानंतर कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित करत ट्विट केलं होतं.

त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “कुंभ हा दर 12 वर्षांनी येतो … मग 2022 ला येणारा कुंभमेळा 2021 मध्ये का घेतला … केंद्र सरकारनी व राज्य सरकारनी त्याला मान्यता का दिली ….
कोरोनाचा झालेला प्रसाराची व त्यामुळे झालेल्या मृत्यूंची जबाबदारी घेणार का …..
महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे अभिनंदन …!”

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.