आळंदी – माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। संत ज्ञानेश्वर माऊलींचा उल्लेख झाला आणि या ओळी आठवल्या नाहीत, असे कधी होत नाही. मराठी भाषेचा अभिमान, भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, वारकरी संप्रदायाचे दैवत, योगी, तत्त्वज्ञ, संतकवी अशा अनेकविध गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर आधारित आरविक प्रोडशन, प्रमोद श्रीवास्तव दिग्दर्शित शुद्ध सांप्रदायिक मालिका “माझा ज्ञानोबा’ या नवीन मालिकेचे पोस्टर आणि टिझरचे अनावरण शांतीब्रह्म हभप मारूती महाराज कुऱ्हेकर यांच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाच्या मान्यवर महाराज मंडळीच्या हस्ते आळंदीत करण्यात आले.
याप्रसंगी आमदार दिलीप मोहीते, रामरावजी ढोक महाराज, राजाभाऊ चोपदार, अजित वडगावकर, नगरसेवक सचिन गिलबिले, दिनेश घुले, किसन महाराज तापकीर, नगरसेविका शैला तापकीर, सुवर्णा बुर्डे, खुशाल तापकीर, नाझिम शेख, निलेश बोरचटे, प्रसाद जगताप, संग्राम भंडारे, संदीप लोहार, आम्ही वारकरीचे हभप सचिन पवार, विश्व वारकरी सेनेचे पुरुषोत्तम महाराज हिंगनकर, धनंजय वसवे, कुणाल तापकीर, दीपक काटे, पोलीस अधिकारी विद्या माने, कांताराम कटाले, रोहिदास महाराज हांडे, नारायण महाराज गोरे आणि अनेक महाराज मंडळी, मालिकेतील सर्व कलाकार उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जीवनावर आधारित माझा ज्ञानोबा या नवीन मालिकेत वारकरी संप्रदायाशी निगडीत किर्तनकार, प्रबोधनकार, प्रवचनकार, गायक,वादक,साधक,वारकरी संप्रदाय महिला प्रतिनिधी यांनी अभिनय केला आहे. या मालिकेच्या उभारणीत निर्माता प्रशांत पवार, हभप जलाल महाराज सय्यद, सह निर्माता शुभांगी कमुनिकेशनचे प्रमोद भळगट, हभप शुभम पानगव्हाणे, कार्यकारी निर्माता हभप गंभीर महाराज अवचार, सुमित पवार यांनी परिश्रम घेतले आहे.
माझा ज्ञानोबा ही मायबोली या वाहिनी वर नवीन मालिका गुरुवारी (दि. 30) पासुन रात्री 9 ते 9. 30 या वेळेस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे तरी सर्व प्रेषकांनी माझा ज्ञानोबा ही नवीन मालिका अवश्य बघावी अशी विनंती मालिकेचे सह निर्माता शुभांगी कमुनिकेशनचे प्रमोद भळगट यांनी सांगितले.