बॉलिवूडच्या बर्याच अभिनेत्री मग शिल्पा शेट्टी, मलाइका अरोरा किंवा सुष्मिता सेन असो, यांनी चाळीशी पार केल्यावरही आपल्या आकर्षक व फिट देहयष्टीमुळे सर्वांना चकित केले आहे. या सर्व अभिनेत्री नियमितपणे योग करतात. 47 वर्षीय मलायका अरोराने तिच्या फिटनेसचे रहस्य योगा हेच असल्याचे सांगितले आहे. जाणून घेऊया, कोणत्या योगासनांनी या वयातही मलायकाला इतके फिट ठेवले आहे.
1. सर्वांगासन
मलायका अरोरा तिच्या योग रुटीनमध्ये सर्वांगासन करते. सर्वंगासन करण्याने आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम होतो. आपले वजन जास्त असल्यास, या आसनमुळे हळूहळू कमी होण्यास सुरवात होईल. कालांतराने, शरीराची लवचिकता देखील वाढेल. सर्वांगासन करण्यासाठी वॉल देखील वापरली जाऊ शकते. हळूहळू जेव्हा ते नियमितपणे केले जाते तेव्हा कोणत्याही आधाराशिवाय ते चांगले करणे जमू लागते.
2. हलासन
हलासन देखील निरोगी राहण्यासाठी केले जाते. हलासन करण्यासाठी जमिनीवर पडून रहा. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हळूहळू ते वर उचला आणि मग त्यांना कपाळापासून डोक्याच्या मागे न्या. असे केल्याने, शरीराचा नांगरासारखा आकार होईल. पाय वाकवू नका. या पोझमध्ये कमीतकमी 15 सेकंद राहा. आपण दररोज हे आसन केल्यास चांगले परिणाम दिसून येतील.
3. वृक्षासन
एखादी व्यक्ती दररोज केवळ वृक्षसन करूनही निरोगी राहू शकते. हे आसन करणे खूप सोपे आहे. या आसनाने शरीराचा आकार एखाद्या झाडासारखा दिसतो. हे करण्यासाठी, प्रथम सरळ उभे रहा, एक पाय हळू हळू वर घ्या आणि दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. दोन्ही हात आकाशाकडे न्या आणि अभिवादन करणारी मुद्रा करा. दररोज हे करा, शरीरातील चरबी कमी होईल आणि लवकरच आपण तंदुरुस्त दिसू शकाल.
4. उष्ट्रासन
महिलांनी उष्ट्रासन करणे खूप महत्वाचे आहे, म्हणून मलायका स्वत: हे आसन आवर्जून करते. उष्ट्रासन केल्याने शरीरात लवचिकता येते, त्याचबरोबर पोट, मांड्या यावरील चरबी देखील लवकर कमी होते. ज्या स्त्रियाना अनियमित मासिक पाळी असेल त्यांनी नियमितपणे उष्ट्रासन केले तर लवकरच त्यांच्या सर्व समस्या दूर होतात. याद्वारे, पचन यंत्रणादेखील योग्यरित्या कार्य करते.