जालना : आता उद्या रविवारी ३ नोव्हेंबर रोजी मराठा समाजाकडून उमेदवार कोण या सस्पेन्सवरून पडदा हटणार आहे. उद्या मराठा नेते मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार असेल, हे जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रविवारी सकाळी सात वाजता राज्यातील सगळ्या उमेदवारांना अंतरवाली सराटीत येण्याचे आवाहन मराठा नेते मनोज जरांगे यांनी केले आहे.
अंतरवाली सराटीत दलित मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत मनोज जरांगे यांनी बैठक घेतली असून बैठकीत जागेच्या बाबत चर्चा झाली. या बैठकीला राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांच्यासह वक्फ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांच्यावतीने माजेद शेख हे उपस्थित होते. उद्या पुन्हा चर्चा होईल असे जरांगे यांनी सांगितले आहे.
उद्या सकाळी 7 वाजता राज्यातील सगळे उमेदवार अंतरवाली सराटीत चर्चेला या असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे. विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मतदार संघ आणि उमेदवार यांच्या नावाची उद्या मनोज जरांगे घोषणा करण्याची शक्यता असून उद्या सायंकाळी चांगला निर्णय होईल, असं जरांगे यांनी म्हटले आहे.