उद्याचा निकाल ठरवणार भाजपचं ‘भवितव्य’

नवी दिल्ली  – देशाच्या 11 राज्यांमधील 58 विधानसभा जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचा निकालही उद्या (मंगळवार) जाहीर होणार आहे. मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीच्या निकालावर तेथील भाजप सरकारचे भवितव्य अवलंबूून असल्याने मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मध्यप्रदेशातील सर्वाधिक 28 जागा पोटनिवडणुकीला सामोऱ्या गेल्या. त्या राज्याची सत्ता राखण्यासाठी भाजपला किमान 8 जागा जिंकणे अनिवार्य आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपने रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांमध्ये बहुतांश कॉंग्रेस सोडून त्या पक्षात प्रवेश करणारे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचा समावेश आहे.

त्यामुळे ज्योतिरादित्य यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे. गुजरातमधील 8 आणि उत्तरप्रदेशातील 7 जागांच्या पोटनिवडणूक निकालाही महत्व आहे. त्याशिवाय, कर्नाटक, ओडिशा, नागालॅंड, मणिपूर, झारखंड, छत्तीसगढ, तेलंगण आणि हरियाणातही पोटनिवडणुका झाल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.