LPG Gas Price – अर्थसंकल्पानंतर (Budget 2021) सरकारी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) ने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ केलीय. इंडियन ऑईल काॅर्पोरेशन लिमिटेड (IOC) च्या वेबसाईटनुसार 14.2 किलोग्रॅम एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 25 रूपयांनी वाढून 719 रूपये झाली आहे. हे नवीन दर 4 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आले आहेत.
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या किंमतींमध्ये चढ-उतार होत असतात. यावेळी 1 फेब्रुवारीला विना अनुदानित 14.2 किलो गॅसची किंमत वाढवण्यात आली नव्हती मात्र, 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत 190 रूपयांनी वाढवण्यात आली होती. पण आज 4 फेब्रुवारीला घरगुती गॅसची किंमत 25 रूपयांनी वाढवण्यात आली आहे.
14 किलो विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 25 रूपयांनी वाढवण्यात आल्यानंतर आता तुम्हाला 719 रूपये मोजावे लागणार आहेत. दरवाढीनंतर दिल्लीत स्वयंपाकाच्या गॅसचे दर 719 रूपये, कोलकाता मध्ये 745.50 रूपये, मुंबईत 719 रूपये तर चेन्नईत 735 रूपये प्रति सिलिंडरवर गेले आहेत.
दरम्यान कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 6 रूपयांची घट करण्यात आली आहे. कपातीनंतर 19 किलो गॅस सिलिंडरची किंमत मुंबईत 1482.50 रूपये, चेन्नईत 1649 रूपये झाली आहे.