बंगळुरू – कर्नाटकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही जागांवर भाजपचा विजय झाल्याने जल्लोष साजरा करण्यात आला. हावेरी जिल्ह्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना विजयाचा जल्लोष महागात पडला असून 15 कार्यकर्ते रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
कार्यकर्त्यांनी जो गुलाल वापरला होता त्यामध्ये त्वचेला हानी पोहोचवणारे घटक होते. या गुलालामध्ये आम्लाचे प्रमाणही जास्त होते. यामुळे ज्या कार्यकर्त्यांच्या अंगावर हा गुलाल पडला त्यांच्या त्वचेची जळजळ व्हायला सुरुवात झाली. 15 कार्यकर्त्यांचे तोंड आणि हात भाजल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे डॉक्टरांनी सांगितले.