लॉयन राणी अहलुवालिया यांना आंतरराष्ट्रीय सन्मान

पुणे : एमजेएफ लायन प्रेमचंद बाफना आणि डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर एमजेएफ लायन रमेश शहा यांनी रिजिन चेअरपरसन लायन राणी एस.एस. अहलुवालिया यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. यावेळी डावीकडून एमजेएफ लायन ओमप्रकाश पेठे, फर्स्ट लायन लेडी स्मिता शहा, एमजेएफ लायन अभय शास्त्री व श्री. अहलुवालिया

पुणे -दीर्घ पल्ल्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल लॉयन राणी अहलुवालिया यांना लायन्स क्‍लब इंटरनॅशनलच्या अध्यक्षांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृष्णसुंदर गार्डन येथे झालेल्या उडाण या विभागीय परिषदेत हा पुरस्कार देण्यात आला.

2003 पासून राणी अहलुवालिया यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यात आली. यावेळी लायन्स क्‍लबचे 450 सदस्य उपस्थित होते. त्यात लायन ज्योती तोष्णीवाल, लायन राजकुमार राठोड, लायन चंद्रकला शेट्टी यांचा समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर आणि लायन शाम खंडेलवाल व लायन विजय जाजू यांनी राणी अहलुवालिया यांच्या कामगिरीचे कौतुक केले. या अगोदर राणी अहलुवालिया यांना गोल्ड ऍवार्ड, डायमंड ऍवार्ड मिळाले आहेत. त्याचबरोबर खेळातील प्रावीण्याबद्दलही त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे लायन्स क्‍लब परिवारात अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)