लालकृष्ण आडवाणी यांनी संसदेत बोलणे केले कमी

नवी दिल्ली – गेल्या लोकसभेच्या तुलनेत भाजपाच्या मार्गदर्शक मंडळातील सदस्य लालकृष्ण आडवाणींचे शब्द जवळपास 99 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहेत. पंधरावी लोकसभा (2009 ते 2014) आणि सोळावी लोकसभा (2014-19) यांचा विचार केल्यास हे दिसून येते.

गेल्या पाच वर्षात आडवाणी संसदेत 296 दिवस उपस्थित होते. या काळात ते 365 शब्द बोलले. कधीकाळी संसदेत धडाडणारी, सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारी भाजपाची ही तोफ आता अगदी थंड झाली आहे.

8 ऑगस्ट 2012 रोजी आसाममधील घुसखोरी आणि राज्यात होणारा हिंसाचार यावर स्थगन प्रस्ताव आणण्यात आला. यावरील चर्चेवेळी संसदेत भाजपाचं नेतृत्त्व आडवाणी यांनी केले. आडवाणींनी मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारला अडचणीत आणलं. साडेसहा वर्षांपूर्वी आडवाणींनी केलेल्या त्या भाषणात सत्ताधाऱ्यांनी 50 वेळा व्यत्यय आणला.

Leave A Reply

Your email address will not be published.