कुंभपर्वात हजारो अनिवासी भारतीय

केंद्र सरकार व संयोजकांकडून विशेष सुविधा

प्रयागराज – कुंभची दिव्यता अनुभवण्यासाठी 3200 अनिवासी भारतीय केंद्रीय विदेश राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्या नेतृत्वाखाली प्रयागराज येथे पोहोचले आहेत. कुंभमधील देशाची संस्कृती तसेच अध्यात्मिक वारसा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनिवासी भारतीयांना सांस्कृतिक वारसा दाखवून देण्यासाठी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात संस्कृती ग्राम, कला ग्राम तसेच शिल्पग्राम वसविण्यात आले आहे. संस्कृती ग्राममध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या मानवी संस्कृतीचा प्रवास दिसून येणार आहे. कुंभमध्ये अनिवासी भारतीयांना सर्व राज्यांची सांस्कृतिक जडणघडण तसेच संस्कृतीचे दर्शन घडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

संगमाच्या घाटांवर सामान्य भाविकांना स्नान करण्याची अनुमती देण्यात आली नाही. याचबरोबर अक्षयवट, बडे हनुमान मंदिरात देखील सामान्यांना प्रवेश देण्यात आला नाही. अनिवासी भारतीय या ठिकाणी स्नान तसेच पूजन केल्यावर भ्रमण करत आहेत. मॉरिशसच्या पंतप्रधानांनी पत्नीसह अक्षयवटमध्ये पूजा केली. अनिवासी भारतीय तीन गटांमध्ये प्रयागराजमध्ये पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेकरता विविध न्यायदंडाधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांसह कमांडो तैनात आहेत.

सुमारे 2000 भारतीय वंशाचे विदेशी नागरिक इंद्रप्रस्थ सिटीमध्ये तर अन्य अनिवासी भारतीय वैदिक टेंट सिटी, कुंभ व्हिला आणि आगमन क्षेत्रात वास्तव्य करून आहेत. अलाहाबाद विद्यापीठाच्या 200 सेवामित्रांनी अनिवासी भारतीयांचे स्वागत केले. अनिवासी भारतीयांना प्रयागराजहून दिल्लीला नेण्यासाठी विशेष रेल्वेंची व्यवस्था करण्यात आली आहे. अनिवासी भारतीय 300 नौकांमधून किल्ला घाट येथे दाखल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)