#INDvAUS : टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती

मुंबई – येत्या 24 फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या मालिकेत पुनरागमन करणार असून लेग स्पिनर गोलंदाज मयंक मार्कंडेला टी-20 मालिकेतून पदार्पणाची संधी दिली गेली आहे. तर टी-20 मालिकेत कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली आहे.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन ट्‌वेंटी-20 सामने खेळणार आहे. या सामन्यांसाठी निवडलेल्या संघात फिरकीपटू कुलदीप यादवला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूझीलंड दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याचे संघात स्थान कायम आहे, तर बुमराह कमबॅक करणार आहे. लोकेश राहुलही या मालिकेतून भारतीय संघात कमबॅक करणार आहे. उमेश यादवला संघात स्थान मिळाले असून भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)