पाटण – कोयना धरण परिसर मंगळवारी सकाळी 9.47 वाजता भूकंपाचच्या सौम्य धक्क्याने हादरला. भूकंप मापनयंत्रावर या धक्क्याची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल एवढी नोंदवण्यात आली. सौम्य स्वरूपाचा भूकंपाचा धक्का असल्याने कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने स्पष्ट केले.
दरम्यान, भूकंपाचा केंद्रबिंदू काडोली गावाच्या पश्चिमेला 7 किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. कोयना धरण परिसरात आठ जानेवारी रोजी सौम्य स्वरूपाचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यानंतर एक महिन्याच्या विश्रांतीनंतर कोयना धरण परिसरात हा दुसरा भूकंपाचा धक्का जाणवला. मंगळवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.47 वाजता 3.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला.