कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा आज दुसरा दिवस. या निमित्ताने अंबाबाई देवीची पराशरांना महाविष्णूस्वरूपात दर्शन या रूपात पूजा बांधण्यात आली.
श्री करवीर महात्म्यतील स्तोत्रतून होणारे श्री करवीर निवासिनीचे दर्शन यानिमित्ताने घडवण्यात आलेले आहे. द्वितीयेला करवीर निवासिनी ही पराशरांना महाविष्णू स्वरूपात दर्शन देताना विराजमान झाली आहे.
महालक्ष्मीला जेव्हा घोर तप करणाऱ्या पराशरांना महाविष्णू रूपात दर्शन देते, तेव्हा त्यांच्या सर्व संशय भेदभाव नष्ट होतो आणि महालक्ष्मीला विष्णूस्वरूपिणी जाणून तिच्यापुढे नतमस्तक होतात, अशी आख्यायिका आहे. ही पूजा मकरंद मुनींश्वर यांनी बांधली.