पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी लाॅकडाऊन घोषित केले आहे. यांचा फटका हातावर पोट असणाऱ्या गरीब व गरजू नागरिकांना बसत आहे. शहरातील किन्नर समुदायातील सदस्यांना देखील याचा फटका बसत असून त्यांना जीवनावश्यक साहित्याची गरज भासत असून त्याची उपासमार होत आहे.
त्यामुळे शहरातील मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने किन्नर समुदायातील सदस्यांना जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थेला किन्नर समुदायपर्यंत जीवनाश्यक वस्तू पुरविताना अडथळा निर्माण होऊ नये याकरिता संस्थेच्या सदस्यांना शहरात 27 ठिकाणी ये- जा करण्यासाठी पोलिसांकडून वाहन परवाना देण्यात आला आहे.