जेट एअरवेजची परिस्थिती सुधारेल – नरेश गोयल

मुंबई – जेट एअरवेज सध्या अनेक अडचणीतून जात आहे. या अडचणी दूर करण्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करीत आहे. लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल. मात्र, दरम्यानच्या काळात कर्मचाऱ्यांनी आपल्याला सहकार्य करावे असे भावनिक आवाहन जेट एअरवेज कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी केले आहे.

विशेष म्हणजे गोयल यांनी गुंतवणूकदार आणि बॅंकर्सनी सांगितल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा माध्यमात चालू आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून कंपनीसमोर काही आर्थिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ते सोडविण्यासाठी कंपनीने प्रयत्न केले आहेत.

आता शेवटच्या टप्प्यात कर्मचाऱ्यांनी या प्रयत्नांना साथ द्यावी. यासाठी मी पाहिजे तो त्याग करायला तयार आहे. कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे हीत माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे, असे आश्‍वासन गोयल यांनी या पत्रात दिले आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून कंपनीने बरेच भागभाडवल बॅंकांना दिले आहे. आता बॅंकाचे भाग भांडवल 51 टक्के पेक्षा जास्त झाले आहे.

कंपनीने कर्जाचे रूपांतर भागभांडवलात करण्याची परवानगी दिलेली आहे. त्याला भागधारकानी मंजुरी दिली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे आणि त्यांचे सहकारी पुढील काम करीत आहेत. 18 मार्चपर्यंत बरेच प्रश्‍न कमी होतील. या काळात कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाला मदत करावी असे गोयल म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या पगार वितरणावर परिणाम झालेला आहे. त्याचबरोबर भाडे न दिल्यामुळे काही विमाने उड्डाणापासून थांबविण्यात आली आहे.

“जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत व्यवस्थापनाला ज्याप्रमाणे सहकार्य केले त्याप्रमाणे आणखी काही काळ सहकार्य करावे. कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आपण कोणताही त्याग करण्यास तयार आहोत.
– नरेश गोयल ,अध्यक्ष, जेट एअरवेज

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)