वेलिंग्टन -आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाचा बीसीसीआयला कोणताही प्रस्ताव दिलेला नाही, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने सांगितले आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने असा प्रस्ताव आल्याचे जाहीर
केले होते.
मात्र, त्यात तथ्य नाही. यंदाची आयपीएल स्पर्धा श्रीलंका, अमिराती किंवा न्यूझीलंडमध्ये होऊ शकते, असेही या सूत्राने व्यक्त केले होते. ही स्पर्धा करोनाच्या धोक्यामुळे अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत होणार असे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले होते. ही स्पर्धा भारतात होणार की परदेशात याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे.