महाराष्ट्रात उद्योगांसाठी वातावरण पूरक करण्याचा प्रयत्न

मुंबई – महाराष्ट्र औद्योगिक व आर्थिक विकास असोसिएशन, एसएमई चेंबरतर्फे व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पाचव्या एकदिवसीय महाराष्ट्र आर्थिक परिषदेचे मुंबईत 21 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे. औद्योगिक आणि आर्थिक वृद्धीसाठी विद्यमान सरकारने केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे, व्यवसाय सुलभतेच्या माध्यमातून केलेल्या विविध बदलांचा परामर्श घेणे, रोजगार निर्मितीसाठी नव्या योजनांवर चर्चा करणे, यावर या परिषदेत तपशिलात विचारविनिमय केला जाणार आहे.

आर्थिक वाढीसाठी उद्योग आणि एसएमईचे सुदृढीकरण, स्टार्ट-अप आदी विषयांवर यावेळी चर्चा होणार असल्याचे संयोजकांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आदींचे या परिषदेस मार्गदर्शन लाभेल. असोसिएशनतर्फे दिल्या जाणाऱ्या प्राइड ऑफ महाराष्ट्र ऍवार्डस या पुरस्कारांचे यावेळी वितरण होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.