fbpx

31 ऑक्टोबर : ‘आयर्न लेडी’ इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या मारून त्यांची हत्या केली होती. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कणखर निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणूनही ओळखलं जातं.

इंदिरा गांधींनी 1966 ते 1977 या दरम्यान सलग तीन वेळा देशाचं नेतृत्व केलं. 1980 साली दुसऱ्यादा पंतप्रधान पदावर पोहोचल्या आणि 31 ऑक्टोबर 1984 रोजी पदावर असतानाच त्यांची हत्या करण्यात आली.

*देश-विदेशच्या इतिहासात 31 ऑक्टोबरच्या तारखेला नोंद असलेल्या प्रमुख घटना-

1) 1875 : सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म.
2) ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या उद्घाटन सत्राचे मुंबईत आयोजन.
3) 1941 : 15 वर्ष्याच्या कठोर परिश्रमानंतर दक्षिण डकोटच्या ब्लॅक हिल्समधील ‘माउंट रेशमोर’ राष्ट्रीय संग्रहालय पूर्ण झाले. तेथे डोंगरावर अमेरिकेचे चार अध्यक्ष जॉर्ज वाशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रूझवेल्ट आणि अब्राहम लिंकन यांचे मुखवटे कोरण्यात आले.
4) 1966 : भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी पनामा नहरला पार केले.
5) 1984 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान यांची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली.
6) 2003 : मलेशियातील महाथिर युगाचा शेवट.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.