देशातील सर्वात जास्त सक्रिय करोनाबाधित महाराष्ट्रात; जाणून घ्या TOP 8 राज्यांची आकडेवारी

नवी दिल्ली – देशातील कोविडबाधित सक्रिय रुग्णसंख्या आज 4 लाख 55 हजार 555 इतकी झाली असून एकूण बाधित रुग्णसंख्येच्या तुलनेत सक्रिय रुग्णसंख्या 4.89 टक्के आहे. सक्रिय रुग्णसंख्येपैकी 70 टक्के रुग्णसंख्या ही महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल आणि छत्तीसगढ या 8 राज्यांमधील आहे.

आज महाराष्ट्रातील एकूण सक्रिय कोविड रुग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 87,014 आहे, त्या खालोखाल केरळातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या 64,615 तर दिल्लीतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या 38,734 आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 43,082 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. महाराष्ट्रात सर्वाधिक 6,406 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. त्या खालोखाल दिल्लीत 5,475, तर केरळात 5,378 नवीन कोविड रुग्ण नोंदवले गेले. देशभरात आतापर्यंत एकूण 87 लाख रुग्ण करोनामुक्‍त झाले आहेत. देशात गेल्या 24 तासात 39,379 जण बरे झाले आहेत.

एका दिवसातील नव्याने बरे झालेल्यांची संख्या केरळात सर्वाधिक म्हणजे 5,970, तर दिल्लीत 4,937 आणि महाराष्ट्रात त्याखालोखाल 4,815 आहे. एकूण कोविड मृत्यूंपैकी 83.80 टक्के हे महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली, पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश या 10 राज्यांमधील आहेत. गेल्या 24 तासांत 492 कोविड मृत्यूंची नोंद झाली आहे.

दिल्लीत सर्वाधिक म्हणजे 91 नवीन मृत्यूसंख्येची नोंद झाली, तर महाराष्ट्रात 65 नवीन मृत्यूसंख्येची नोंद आणि त्या खालोखाल पश्‍चिम बंगालमध्ये 52 मृत्यू नोंदवले गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.