Corona | देशभरात करोनाबाबत चिंता वाढली! ‘ही’ धक्कादायक आकडेवारी पाहा आणि पूर्वीपेक्षा आता जास्त काळजी घ्या..

नवी दिल्ली – देशातील करोनाचा प्रसार अत्यंत वेगाने वाढत असून देशात गेल्या 24 तासांत करोनाचे एकूण 81 हजार 466 रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे.

एकाच दिवसांत इतक्‍या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येण्याचा 2 ऑक्‍टोबर 2020 नंतरचा हा पहिलाच प्रकार आहे. करोनामुळे दिवसभरात एकूण 469 जण दगावले असून देशभरात या रोगामुळे आत्तापर्यंत दगावलेल्यांची संख्या 1 लाख 63 हजार 396 इतकी झाली आहे.

गेले 23 दिवस सलग देशातील करोना रूग्णांची संख्या वाढत आहे. देशातील सध्याचे सक्रिय बाधित 6 लाख 14 हजार 696 इतके आहेत. आत्तापर्यंत एकूण 1 कोटी 15 लाख 25 हजार 39 रूग्ण बरे झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.