नवी दिल्ली – देशभरात गेल्या 24 तासांत करोनाचे 1 लाख 31 हजार 968 रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्णांच्या बाबतीत रोजच नवा विक्रम नोंदवला जाऊ लागला आहे. दरम्यान, आता करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडाही हळूहळू वाढताना दिसत असून काल दिवसभरात 780 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
त्यामुळे मरण पावलेल्यांची संख्या आता 1 लाख 67 हजार 642 इतकी झाली आहे. गेले सलग 30 दिवस करोनाची संख्या वाढत आहे. या तीस दिवसांतच देशभरात 9 लाख 79 हजार 608 रुग्णांची भर पडली आहे. नव्याने लागण होण्याचे हे प्रमाण आता 7.5 टक्क्यांवर गेले आहे. रिकव्हरी रेटही 91 टक्क्यांपर्यंत खाली आला आला आहे. गुरुवारी एकूण 13 लाख 64 हजार 205 चाचण्या घेण्यात आल्या.