India Corona Updates : करोना रुग्णांची वाढ किंचित घटली; मात्र, मृत्यूचे प्रमाण जैसे थे

नवी दिल्ली, दि. 16 – देशातील करोना रुग्ण वाढीचे प्रमाण काहींसे घटत असल्याचे याच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे. गेल्या चोवीस तासात देशात एकूण 3 लाख 11 हजार नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात एकूण 4077 रुग्ण दगावले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा 2 लाख 70 हजार 284 इतका झाला आहे.

देशातील सक्रिय बाधितांची संख्या घटून आता 36 लाख 18 हजार 458 इतकी झाली आहे. तथापि रोजचा अधिकृत मृतांचा आकडा मात्र गेले काहीं दिवस सतत चार हजारांपेक्षा अधिक असल्याने ती एक अजूनही चिंतेची बाब आहे.

मात्र नवबाधितांच्या संख्येवर आता हळूहळू नियंत्रण येऊ लागले आहे. त्यामुळे वातावरण काहीं प्रमाणात दिलासाजनक बनत आहे. अनेक राज्यांच्या आरोग्य यंत्रणा दिवसरात्र या आपत्तीशी झुंजत असून अनेक राज्यांमध्ये प्रभावी लॉकडाऊन केले जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.