Coronavirus | देशात गेल्या 24 तासात दीड लाखाहून अधिक रुग्ण; ‘या’ 5 राज्यांची स्थिती चिंताजनक

नवी दिल्ली – देशात गेल्या चोवीस तासात 1 लाख 52 हजार 879 नवीन करोना रूग्ण आढळून आले आहेत. देशाच्या विविध भागात पुन्हा करोना खूप वेगाने फैलावत असल्याचे दिसत असले तरी यातील सुमारे 70.82 टक्के रूग्ण पाच राज्यांतच केंद्रीत झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि केरळ अशी या पाच राज्यांची नावे आहेत. देशात आता करोनाचे सक्रिय बाधित 11 लाख 8 हजार 87 इतके असून त्यातील 48.57 टक्‍के बाधित एकट्या महाराष्ट्रात आहेत. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात करोनाचे 55 हजार 411 नवीन रूग्ण आढळून आले असून छत्तीसगड मध्ये 14 हजार 98 व उत्तरप्रदेशात 12 हजार 748 करोना रूग्ण आढळून आले आहेत.

वरील पाच राज्यांखेरीज तामिळनाडु, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही करोना रोगाचे पेशंट लक्षणीयरित्या वाढत आहेत. दरम्यान करोनामुळे मरणाऱ्यांची संख्याही रोज वाढत असून गेल्या 24 तासांतील मृतांचा आकडा 839 इतका आहे. त्यात महाराष्ट्रातील मृतांचे प्रमाण 309 इतके आहे. गेल्या 24 तासांत दहा राज्यांत करोनामुळे एकाचेही निधन झालेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.