नवी दिल्ली – देशातील कोविड रुग्णांची संख्या आता 88 दिवसांच्या नीचांकी पातळीवर आली असून गेल्या 24 तासांत देशात 53 हजार 256 करोना रुग्ण आढळून आले आहेत. काल दिवसभरात देशात कोविडमुळे 1422 रुग्ण दगावले असून त्यामुळे देशात मरण पावलेल्यांची एकूण संख्या आता 3 लाख 88 हजार 135 इतकी झाली आहे.
देशातील सक्रिय बाधितांचे प्रमाण आता 2.35 टक्के इतके झाले आहे. तर रिकव्हरी रेट आता 96.36 टक्के इतका नोंदवला गेला आहे. काल रविवारी देशभरात करोनाच्या एकूण 13 लाख 88 हजार 699 चाचण्या करण्यात आल्या. तर देशात आत्तापर्यंत 28 कोटी 36 हजार 898 जणांना कोविडची लस देण्यात आली आहे.
देशातील कोविडचा आलेख झपाट्याने खाली येताना दिसत असला तरी आता पुन्हा तिसऱ्या लाटेची शक्यता सर्वच बाजूने व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता त्याचीही दक्षता घेतली जाऊ लागली आहे.