आयएल अँड एफएस कडून पतमानांकन वाढविण्यासाठी प्रताप

अगोदर भेटवस्तू; नंतर दबाव व शेवटी धमक्‍या

नवी दिल्ली – 90 हजार कोटी रुपयांचा प्रश्‍न निर्माण केलेल्या आयएल अँड एफएस या कंपनीने आपले पतमानांकन वेळोवेळी वाढविण्यासाठी अनेक प्रताप केल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आढळून येऊ लागले आहे. या संस्थेचे अधिकारी पतमानांकन संस्थांच्या अधिकाऱ्यांना सुरुवातीला भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करीत जर त्यांचे ऐकले नाही तर दबाव टाकण्यात येत असे आणि वेळप्रसंगी धमक्‍या दिल्या जात असत असे ऑडिटच्या अंतरीम अहवालातून पुढे आले आहे. ग्रॅंट र्थोटॉन या कंपनीने हे फॉरेन्सिक ऑडिट केले आहे. आता ह्या कंपनीच्या संचालक मंडळावर सरकार नियुक्त नवे संचालक आहेत. या संचालकांनी फॉरेन्सिक ऑडिट करण्याची सूचना केलेली आहे. त्यानुसार सर्वसमावेशक ऑडीट होत आहे.

फॉरेन्सिक ऑडिटच्या अंतरीम अहवालानुसार आयएल ऍण्ड एफएसचे अधिकारी विविध पतमानांकन संस्थाकडे चांगल्या पतमानांकनासाठी वेळोवेळी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. एप्रिल 2013 ते सप्टेंबर 2018 या काळात या संस्थेने जे ई-मेल केले ते ई-मेल फॉरेन्सिक ऑडिट वेळी तपासण्यात येत आहेत.

ऑडिटमध्ये निधीचा गैरव्यवहार झाला आहे काय, अयोग्य व्यवहार केले आहेत का, गैरव्यवहार कशा पद्धतीने केले जात होते, किती रकमेचा गैरव्यवहार झाला आहे, आणि असा प्रकार होऊ नये यासाठी काय करता येईल याचा समावेश आहे, आयएल अँड एफएसला ऑगस्ट 2018 पर्यंत प्रत्येक वेळी चांगले पतमानांकन मिळत गेले होते. त्यामुळे या कंपनीने विविध बॅंकांकडून आणि एनबीएफसीकडून मोठ्या प्रमाणात कर्ज जमा केले होते.

मात्र, मूळ परिस्थिती खराब असल्यामुळे नंतर या कंपनीला या कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे या कंपनीला कर्ज दिलेल्या एनबीएफसी गेल्या दोन वर्षापासून संकटात सापडलेल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)