टी-20 विश्‍वकरंडक होणार : आयसीसी

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्‍टोबरमध्ये टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. सध्या जगभरात करोना विषाणूंचा धोका वाढत असला तरीही ही स्पर्धा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होईल, अशी ग्वाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही ही स्पर्धा दिमाखदार पद्धतीने व्हावी यासाठी जोरदार तयारी केली आहे.

दरम्यान, “कोविड-19′ अर्थात “करोना’ व्हायरसच्या प्रभावामुळे जगभरच्या सर्वच क्रीडा स्पर्धांना फटका बसला आहे.  चीनसह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंच्या प्रभावामुळे तसेच धोक्‍यामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा रद्द झाल्या आहेत.

चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंच्या धोक्‍यामुळे भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा देखील 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर, अनेक क्रिकेट स्पर्धा देखील स्थगित करण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.