लवकरच नवे उत्सर्जनविषयक मापदंड – राजीव गौतम

नव्या नियमांच्या पूर्ततेसाठी कंपन्यांची लगबग

मुंबई – भारतीय वाहन उद्योगात 2020 पर्यंत बीएस-4 हा उत्सर्जन विषयक मापदंड अंमलात येणार आहेत. हे नवे उत्सर्जन निकष पाळण्याची सिद्धता करण्याच्या दृष्टीने वाहन उद्योगाची लगबग सुरू असल्याचे प्रतिपादन होरिबा इंडियाचे अध्यक्ष डॉ. राजीव गौतम यांनी केले. होरिबा तर्फे चाकण येथे वाहन उद्योगासाठी अत्याधुनिक उत्सर्जन चाचणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यावेळी होरिबा (जपान)चे अध्यक्ष डॉ. मासायुकी अदाची आणि तंत्रज्ञान सेवा व्यवसायाचे उपाध्यक्ष हिरू चिहारा हे देखील उपस्थित होते.

डॉ गौतम म्हणाले. हे निकष पाळणाऱ्या वाहनांच्या विकसनाचे काम देखील वेगाने सुरू आहे. यातील सर्वात महत्त्वाचा भाग हा या वाहनांची प्रदूषण विषयक उत्सर्जन चाचणी हा असून अशा प्रकारच्या चाचण्यांसाठी सुविधा पुरविणाऱ्या होरिबासारख्या संस्था देखील या प्रक्रियेचा भाग होत आहेत.

या नव्या विभागात बीएस-4 या मापदंडाच्या पूर्ततेसाठीची वाहनांची चाचणी, युरो-6 मापदंडासाठीची चाचणी (निर्यात वाहनांसाठी), वाहनांची कामगिरी, उंचीवरील प्रदेशात वाहनांचा वापर तसेच प्रत्यक्ष रस्त्यांवरून वाहन चालत असतानाची चाचणी अशा विविध चाचण्या करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असल्याचेही गौतम यांनी सांगितले. होरिबाच्या सध्याच्या कार आणि मालवाहू वाहनांच्या इंजिन चाचणी सेवेला या नव्या सेवांची जोड मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.