हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय शिबिराची घोषणा

नवी दिल्ली – पुढील महिन्यात 23 मार्चपासून मलेशिया येथे होणार असलेल्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेसाठी हॉकी इंडियाने राष्ट्रीय शिबिराची घोषणा केली आहे. या शिबीरासाठी 34 जणांच्या संभाव्य संघाची घोषणा करण्यात आलेली आहे. या शिबीरासाठी सुलतान जोहर स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना जागा देण्यात आलेली आहे. याचसोबत ड्रॅगफ्लिकर रुपिंदरपाललाही शिबीरासाठी बोलावण्यात आले आहे. आता या शिबीरातील त्याची कामगिरी त्याला संघात स्थान मिळवून देते का हे पहाणे औत्सुक्‍याचे असणार आहे.

गोलकिपर : पी. आर. श्रीजेश, सुरज करकेरा, क्रिशन बहादुर पाठक

बचावपटू : हरमनप्रीत सिंह, गुरिंदर सिंह, वरुण कुमार, कोठाजीत सिंह, सुरेंद्र कुमार, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंह, प्रदीप सिंह, सुमन बेक, मनदीप मोर, बिरेंद्र लाक्रा, रुपिंदरपाल सिंह.

मधली फळी : मनप्रीत सिंह, चिंगलेन साना, सुमीत, सिमरनजीत सिंह, निलकांत शर्मा, हार्दिक सिंह, ललित कुमार उपाध्याय, विवेक सागर प्रसाद, यशदीप सिवाच, विशाल अंतिल आघाडीची फळी : आकाशदीप सिंह, रमणदीप सिंह, गुरजंत सिंह, मनदीप सिंह, दिलप्रीत सिंह, सुमीत कुमार, गुरसाहबजीत सिंह, शैलेंद्र लाक्रा, एस. व्ही. सुनील.

Leave A Reply

Your email address will not be published.