नवी दिल्ली : भारतीय महिला हाॅकी संघाच्या विश्लेषणात्मक प्रशिक्षकपदी आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेती जन्नेके स्काॅपमन यांची नेमणूक करण्यात आली आहे. टोकियो स्पर्धेपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याने संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्याचे सांगितले जात आहे.
Hockey India is happy to welcome Janneke Schopman as the Analytical Coach of the Indian Senior Women’s Hockey Team.
Aapka swaagat hai! 🇮🇳 #IndiaKaGame pic.twitter.com/OQcJiZCfE3
— Hockey India (@TheHockeyIndia) January 17, 2020
बंगळुरूमधील एसएआय केंद्रात सुरू होणा-या राष्ट्रीय शिबिरात स्काॅपमन संघासोबत सहभागी होणार आहेत. स्काॅपमन यांच्या मार्गदर्शनाखाली या हंगामात न्यूझीलंड येथे होणा-या स्पर्धेत भारतीय संघ खेळणार आहे.
तसेच याआधी भारताची अनुभवी स्ट्राइकर राणी रामपाल हिच्याकडे आगामी न्यूझीलंड दौ-यासाठी भारतीय महिला हाॅकी संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे तर गोलरक्षक सविता पूनिया ही संघाची उपकर्णधार असणार आहे.
न्यूझीलंड दौ-यात भारतीय महिला संघ २५ जानेवारीला एक सराव सामना खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरूध्द २७ आणि २९ जानेवारीला सामने होतील. यानंतर ब्रिटन संघाविरूध्द ४ फेब्रुवारीला एक सामना होईल, तर ५ फेब्रुवारीला पुन्हा न्यूझीलंडविरूध्द सामना होईल आणि दौ-याचा समारोप होईल.