रेल्वेची जुलै महिन्यात भाडेवाढ..?

पूर्ण अर्थसंकल्पावेळी निर्णय घेतला जाण्याची शक्‍यता

-मागील 20 वर्षांत केवळ 3 वेळा झाली दरवाढ

नवी दिल्ली – अंतरिम बजेटमध्ये रेल्वेला मोठी रक्‍कम दिली आहे. मात्र, जुलैतील पूर्ण बजेटमध्ये रेल्वेचे भाडे वाढण्याची शक्‍यता आहे. जर, सरकारकडून रेल्वेचे भाडे वाढविण्याचा पर्याय दिला नाही, तर अन्य सरकारी विभागांप्रमाणे रेल्वेचा नफा, तोटा पूर्णपणे अर्थमंत्रालयाकडून पाहिला जावा, अशी सूचना रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वेला तोटा कमी करावा, असे सांगण्यात येते; पण बीएसएनएल, आयटीआय आणि अन्य सरकारी संस्थांच्या तोट्याची भरपाई मात्र अर्थ मंत्रालय करते. जर, रेल्वेचे बजेट केंद्रीय बजेटमध्ये एकत्र करण्यात आले, तर रेल्वेचा नफा, तोटा अन्य संस्थांप्रमाणे, सरकारी विभागांप्रमाणे अर्थमंत्रालयाला पाहायला हवा.

यामुळे रेल्वेवरील भार कमी होईल, तसेच रेल्वे केवळ सेवेवर लक्ष केंद्रित करील. रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भाड्यामध्ये किरकोळ वाढ करण्यास परवानगी दिली जावी, ही आमची विनंती आहे. प्रतितिकीट 5 ते 10 रुपयांची वाढ प्रभावी ठरू शकते. यामुळे रेल्वेला आपला तोटा काही प्रमाणात कमी करण्यास मदत होईल. त्याचबरोबर हे जनतेवर ओझे नसेल. कारण, रेल्वे सतत चालण्यासाठी हे आवश्‍यक आहे. गत 20 वर्षांत तीनदा रेल्वेची भाडेवाढ झाली; पण नाममात्र भाडे वाढविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)