शिक्रापूर – सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना शिक्रापुरात दुरंगी लढत रंगत आहे. गावातील वॉर्ड क्रमांक एकमधून शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलचा प्रचारा जोरात सुरू झाला असून मोठा प्रतिसाद या उमेदवारांना मिळत आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शिक्रापूर ग्रामविकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून मयूर खंडेराव करंजे, वंदना रमेश भुजबळ व सारिका उत्तम सासवडे हे तिघे अधिकृत उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी जल्लोषात रॅली काढून शिक्रापूर ग्रामविकास आघाडीच्या समर्थनार्थ घोषणा देत आपला प्रचार सुरू आहे.
यामध्ये महिलांनी मोठा सहभाग नोंदविला आहे तर शिक्रापूर वॉर्ड क्रमांक एकमधून उमेदवारांनी सर्व मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराराची राळ उडवली आहे. यावेळी उमेदवारांनी करोना काळात स्वयंस्फूर्तीने केलेल्या कार्याची जाण नागरिक जाणून असून उमेदवारांना प्रतिसाद मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
तर या रॅलीच्या माध्यमातून अनेक मतदार या तीनही उमेदवारांच्या मागे खंबीरपणे असल्याचे बोलत आहेत. तर यावेळी मतदारांची चर्चा करताना गावातील कचरा व पाण्याच्या मुख्य समस्यांसह आदी सर्व प्रलंबित प्रश्न यापुढील काळामध्ये सोडविणार असल्याचे उमेदवार सांगत असून नागरिक व मतदारांचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे विजयाची खात्री उमेदवारांनी व्यक्त केली आहे.