नवी दिल्ली – सरकारी बॅंकांनी अनुत्पादक मालमत्ता कमी करून कर्जवसुली वाढविण्याचा प्रयत्न केल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत बऱ्याच सरकारी बॅंकांना नफा झाला आहे.
दुसऱ्या तिमाहीत युको बॅंकेला 30 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी बॅंकेला 891 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
दुसऱ्या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बॅंकेला 412 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या बॅंकेला 1,755 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
आयडीबीआय बॅंकेला दुसऱ्या तिमाहीत 324 कोटी रुपयांचा नफा मिळाला. गेल्या वर्षी या तिमाहीत या बॅंकेला तब्बल 3 हजार 459 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.