मागणी वाढल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ

नवी दिल्ली – लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातूनही दर काही प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर शनिवारी वाढले.

दिल्ली सराफात शनिवारी शुद्ध सोन्याच्या दरात 90 रुपयांची वाढ होऊन या सोन्याचा दर 34590 रुपये प्रती 10 ग्रॅम या पातळीवर गेला त्याचबरोबर स्टॅंडर्ड सोन्याचा दरही 90 रुपयांनी वाढून 34440 रुपये प्रती दहा ग्रॅम झाला. उद्योग क्षेत्राकडून आणि दागिने उत्पादकांकडून मागणी कायम असल्यामुळे दिल्ली सराफात शनिवारी तयार चांदीच्या दरातही 140 रुपयांची वाढ होऊन तयार चांदीचा दर 41500 रुपये प्रती किलो या पाळीवर गेला.

मात्र, आता सोन्याचे दर उच्च पातळीवर असल्यामुळे सराफातील वातावरण सावध राहणार आहे. जगभरातील शेअरबाजारात गेल्या महिन्यात जागतिक मंदीच्या शक्‍यतेमुळे विक्रीचे वारे होते. त्यामुळे शेअरबाजारातील पैसा धातू क्षेत्राकडे वळत असल्यामुळे गेल्या महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात बरीच वाढ झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.