नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर कालपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जागतीक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे आज भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफ सोन्याचे दर 297 रुपयांनी वाढून 48,946 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफत तयार चांदीचे दर 1,404 रुपयांनी वाढून 65,380 रुपये प्रति किलो झाले. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,858 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.49 डॉलर प्रति औंस झाले.
लसीकरण चालू झाले असले तरीही युरोप आणि जपान मध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत.त्याचबरोबर अमेरिकेतील संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार काही प्रमाणात सोने खरेदी चालूच ठेवत असल्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यास दिर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांसाठी सोने खरेदी योग्य ठरू शकते असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.