Gold-Silver Price Today – जागतिक बाजारात भांडवल सुलभता वाढणार आहे. त्याचबरोबर सलग चौथ्या दिवशी इतर चलनांच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफ सोन्याचे दर 575 रुपयांनी वाढून 49,125 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. चांदीचे दर 1,227 रुपयांनी वाढून 66,699 रुपये प्रति किलो झाले.
भारतातील आणि जागतिक वायदे बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे स्पॉट मार्केटमध्येही दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,870 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 25.83 डॉलर प्रति औंस झाले.
पटेल म्हणाले की, अमेरिकेत सत्तांतरानंतर नवे सरकार अधिक सवलती देणार आहे. युरोपियन बॅंक भांडवल सुलभता निर्माण करणार आहे. त्यामुळे काही गुंतवणूक सोन्याकडे वळत आहे. सोन्याचे दर खूप 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्यातील गुंतवणूकदारांसाठी खरेदी योग्य राहील असे विश्लेषक सुचवीत आहेत.