Gold Silver Price Today – अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची लक्षणे असली तरी जागतिक गुंतवणूकदारांकडून सोन्याची खरेदी काही प्रमाणात चालू असल्यामुळे सोन्याचे दर वाढले.
सकारात्मक जागतिक संकेतानंतर दिल्ली सराफात सोन्याचे दर 198 रुपयांनी वाढून 48,480 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचे दर 1,008 रुपयांनी वाढून 65,340 रुपये प्रतिकिलो झाले.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेने विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,843 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर वाढून 25.28 डॉलर प्रति औंस झाला. त्यामुळे भारतीय बाजारातही सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले.