नवी दिल्ली – डॉलर कमकुवत होत असल्यामुळे जागतिक शेअर बाजारात सोन्याचे दर वाढत आहेत. त्याचबरोबर भारतीय रुपयाचे मूल्य कमी झाल्यामुळे भारतात सोन्याचे दर वाढत आहेत.
आज सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दरात भरीव वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफ सोन्याचे दर 335 रुपयांनी वाढून 50,969 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तर तयार चांदीचे दर 382 रुपयांनी वाढून 69,693 रुपये प्रति किलो झाले.
रुपयाचे मूल्य आज 13 पैशांनी कमी होऊन रुपयाचा भाव 73.15 रुपये प्रति डॉलर झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,942 डॉलर प्रति औंस व चांदीचे दर 27.30 डॉलर प्रति औंस झाले.